Monday, February 9, 2009

भारतात तालीबानी राजवट आली तर....

तालीबानी राजवट हिंदुस्थानात येईल की नाही हा वाद थोडा बाजूला ठेवूया। ती आली असे क्षणभर गृहित धरूया. त्यानंतर आपल्या देशात काय काय उलथापालथ होईल याचे एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. हे चित्र पूर्णपणे काल्पनिक नाही.

गेले काही दिवस हा प्रश्न माझ्या मनात घोळत आहे. कधी कधी असे वाटते की हिंदुस्थानात अजूनही 80 कोटी हिंदू आहेत. गांधी-नेहरूंच्या काळात ते जसे निराधार, दुर्बल, हताश होते. कोणीही यावे आणि लाथ घालून जावे अशी हिंदूंची अवस्था होती तशी आज नाही. अजूनही काही हिंदूंची सेक्युलॅरिझमची नशा उतरलेली नाही. तरीपण अनेकांची उतरली आहे. त्यामुळे हिंदुस्थानात तालीबानी राजवट येणे शक्य नाही. दुसरा विचार असा येतो की, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर, हिंदूंचे खच्चीकरण हाच अजेंडा असलेला कॉंग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला, त्यातही अर्जुनसिंह, अंतुले, अय्यर (मणीशंकर) हे "अ'पवित्र लोक पुन्हा केंद्रीय मंत्री झाले तर तालीबानी राजवट येण्यात अशक्य ते काय ? हिंदू धर्मीयांचे उच्चाटन होत असेल तर तालीबान्यांना आवतण देण्यास अनेकजण उत्सुक आहेत. सेक्युलॅरिझमची नशा चढलेले हे लोक काहीही करतील.
खोटे वाटते ? तीन वर्षापूर्वी बिहार विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी प्रत्येक जाहीर सभेत लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर ओसामा बिन लादेन याच्या वेशातील बहुरुपी होता. एक केंद्रीयमंत्री मतासाठी लादेनचा वापर करतो. दुसरे उदाहरण सोलापूर शहरातील आहे. लादेन या नावाची जगभर चर्चा होत असताना महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती पहाणीनिमित्त एका उर्दू शाळेत गेले. त्या शाळेतील एका वर्गात डोकावल्यावर "ओसामा बिन लादेन झिंदाबाद' असे फळ्यावर लिहिलेले आढळले. उर्दू शाळेत मुलांच्या मनावर लादेनची कोणती प्रतिमा उर्दू शिक्षक ठसवत होते याचा सहज अंदाज येतो. तालीबानी राजवट हिंदुस्थानात येईल की नाही हा वाद थोडा बाजूला ठेवूया. ती आली असे क्षणभर गृहित धरूया. त्यानंतर आपल्या (आता तालीबानी राजवट आल्यावर या देशाला आपला कशाला म्हणायचे. जे कालपर्यंत या देशाला आपला म्हणत नव्हते ते आता आपला देश म्हणतील) देशात काय काय उलथापालथ होईल याचे एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. हे चित्र पूर्णपणे काल्पनिक नाही. 21 व्या शतकात प्रवेश करताना अफगाणिस्तानात आणि आत्ता पाकिस्तानच्या स्वात या वायव्येकडील प्रांतात तालिबानी जी जीवनपद्धती राबवित आहेत तीच या देशात राबविली जाऊ लागल्यावर काय चित्र दिसेल ते रेखाटण्याचा हा प्रयत्न आहे.
तालीबान्यांना चित्रपटाचे एकदम वावडे आहे। चित्रपटात काम करणे इस्लामविरोधी असल्याने शाहरुख, अमीर, सलमान, सैफ अली, अरबाझ, अकबर आणि जे कोणी खान असतील त्या सर्वांना गोळ्या घालून ठार मारले जाईल. पूर्वी काम करत होता म्हणून फिरोजखान, संजयखान हेही सुटणार नाहीत. नाच हा पण इस्लामविरोधी असल्याने सर्व डान्सबार एका फटक्यात बंद होतील. पाकिस्तानमधील एक नर्तिका शबाना ही तालीबान्यांच्या हाती सापडली तर तिला मैदानात शेकडो लोकांच्या उपस्थितीत गोळ्या घालून ठार मारण्यात आले. डान्सबारला विरोध तर पबचे नावच काढू नका. पब संस्कृतीचे समर्थन करणाऱ्या रेणुका चौधरी, गिरीजा व्यास यांनाही गोळ्या घालून मारले जाईल. खरे तर नौशाद हे माझे आवडते संगीतकार आहेत. त्यांच्याबद्दल असे लिहिताना मला नको वाटते, पण तालीबानी राजवट आल्यावर संगीतकार नौशाद इस्लामविरोधी ठरतील. सनईसम्राट बिस्मिल्लाखान, महान गायक बडे गुलाम अलीखान, तबला सम्राट अल्लारखान हे आता हयात नाहीत. त्यांच्या सी.डी. आहेत. नाचणे, गाणे, वाद्यवादन, चित्रपट हे आक्षेपार्ह असल्याने प्रत्येक गावात अशा सी.डी. गोळा करण्यात येईल. या उप्पर एखाद्याच्या घरी अशी सी.डी. सापडलीच तर तालीबान्याची गोळी त्याच्या छातीतून आरपार गेलीच समजा.

देशात अनेक दर्गे आहेत। त्याच्या उरुसाची सांगता कव्वालीने होत असते. कव्वाली हा प्रकारही इस्लामविरोधी असल्याने कव्वाली आणि कव्वाल इतिहासजमा होईल. मुळात तालीबानी हे वहाबी इस्लामी आहेत. त्यांना फक्त मशीद मान्य आहे. हिंदुस्थानात सध्या जे दर्ग्याचे उदंड पीक आले आहे आणि येत आहे ते तालीबान्यांच्या मते इस्लाम विरोधकांचे षडयंत्र आहे. इस्लामी धर्ममतानुसार अल्लाह हा अमूर्त, निराकार स्वरुपात आहे. दर्गा म्हणजे मूर्तस्वरूप येते. त्यामुळे दर्गा ही कल्पना वहाबी इस्लामला अमान्य आहे. दुसरा मुद्दा म्हणजे हे दर्गे कोणा ना कोण्या मर्त्य मानवाच्या नावाने असतात. इस्लामच्या मते सर्वशक्तीमान अल्लाहच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचीही प्रार्थना, पूजा, भक्ती ही इस्लामविरोधी आहे. कोणाला पटो न पटो, तालीबान्यांच्या वहाबी इस्लाममध्ये दर्ग्याला कसलेही स्थान नाही. औरंगजेब कट्टर मुस्लिम होता. मनात आणले असते तर त्याने आपल्या कबरीला मोठ्या दर्ग्याचे स्वरूप दिले असते. पण नाही. संभाजीनगरला जाऊन शहेनशहा औरंगजेबाची कबर पहा. किती लहान व साधी आहे. परवरदिगार श्रेष्ठ मी क्षूद्र अशी औरंगजेबाची धारणा होती. त्यादृष्टीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाचे थडगे हे इस्लामविरोधीच ठरेल. इस्लाममध्ये महिलेची हत्या निषीद्ध आहे. अफझलखानाने तर प्रतापगडावर जाण्यासाठी विजापूर सोडताना आपल्या जनानखान्यातील 69 बायकांना ठार मारले होते. असला अफजलखान पूजनीय होणे आणि धूप जाळू प्रचंड दर्गा बांधणे, तेथे लोकांनी नवस बोलणे हे सर्व इस्लामलाच मंजूर नाही. या पद्धतीने ताजमहालचे काय होईल सांगता येत नाही.

तालीबानी सत्ता आल्यावर शरीयत लागू होणार हे उघड आहे। लक्षात घ्या, बलात्कार अथवा अनैतिक संबंध यासाठी दगडाने ठेचून मृत्यू ही शिक्षा आहे. अफगाणिस्तानात अफूचे भरपूर पीक येते. नशापाणी इस्लामला अमान्य असल्याने काळे सोने समजली जाणारी अफूची सर्व शेते तालीबान्यांनी पैशाचा मोह न ठेवता उद्‌ध्वस्त केली. दारु, चरस, गांजा, अफू, गर्द जवळ बाळगणे, सेवन करणे, विक्री करणे याचा अर्थ फासावर जाणे हा होईल. चोरी केली तर हात तोडणे, दुसऱ्यावर हल्ला करून त्याचा एखादा अवयव निकामी केला तर हल्लेखोराचा तोच अवयव तोडला जाईल. दात पाडला तर दात पाडला जाईल. डोळा फोडला तर हल्लेखोराचा डोळा फोडला जाईल. हे नियम लागू झाल्यावर गुन्ह्यांचे प्रमाण शून्यवत होईल यात शंका नाही. मी स्वत: अशा न्यायव्यवस्थेचे स्वागत करेन. याचा फटका सर्वाधिक फटका कोणाला बसेल हे प्रत्येक गावातील पोलीस रेकॉर्डच सांगेल.

आता अशी तालीबानी राजवट आल्यावर मद्यनिर्मितीचे कारखाने बंद पडतील। विजय मल्ल्या एकदम गरीब माणूस होईल. एम.एच.व्ही. आणि त्यानंतरच्या सगळ्या सीडी कंपन्या बंद पडतील. सध्या 300 चॅनल्स आहेत आणि आणखी 200 येऊ घातली आहेत. पण यापुढे पीस टीव्ही आणि क्यू टीव्ही सोडल्यास अन्य चॅनल दिसणार नाही. झी, सोनी, स्टार, इ टीव्ही, सन, जेमिनी विसरून जा. फार तर पवित्र कुराणाचे मराठीत अर्थ विशद करणारे एखादे मराठी चॅनेल सुरू होईल.

फॅशन हा प्रकारच बंद होईल। बुरखा सक्तीचा आणि पुरुषांना कुडता व टाचेच्या वर दोन इंच तुमान हाच पोषाख. टाचेपर्यंत विजार आली म्हणून एका शिक्षकाला 15 दिवसापूर्वी रस्त्यातच गोळी घालून मारण्यात आले. "येथे दाढी केली जाणार नाही' असा फलक प्रत्येक केशकर्तनालयाबाहेर लावावा लागेल. त्यामुळे न्हाव्याचा धंदा निम्मा तरी कमी होईल.

या सर्वांचा एकत्रित विचार केला तर किती क्षेत्रे बंद होऊन किती रोजगार कमी होईल ते कळेल. प्रमोद मुतालिकचे लग्न झाले नाही म्हणून तो असा वागतो असे म्हणणारी रेणुका चौधरी, प्रमोद मुतालिकला रानटी म्हणणारा सोली सोराबजी आणि फळ्यावर "लादेन झिंदाबाद' असे लिहिणारा उर्दू शिक्षक शिक्षक या सर्वांना या परिणामांचा विचार करावा.

Sunday, February 1, 2009

श्रीराम सेनेचे स्वागतार्ह पाऊल


तरुण मुलगी रात्री 1-2 वाजता घरी आली तरी "इतका वेळ कोठे होतीस, काय करत होतीस?' असा जाब तिला घरच्यांनी विचारायचा नाही, याला स्त्रीमुक्ती म्हणतात का? मुलीला असा जाब विचारणे, कपडे नीट परिधान करायला लावणे, यात कसला स्वातंत्र्याचा संकोच?


ज्यांचे लग्नाचे वय झालेले आहे आणि जे तरुण सध्या वधुसंशोधन करीत आहेत, अशा तरुणांना माझा एक प्रश्न आहे. उद्या, परवा तुम्ही जी मुलगी पाहायला जाणार असाल, ती मुलगी सिगारेट ओढते. जीन किंवा बिअर पिणे हा तिला गावंढळपणा वाटतो. व्हिस्की, रम ती नेहमी घेते. पबमध्ये जाऊन पिणे, तंग कपड्यात झिंगून ओळखीच्या वा अनोळखी तरुणांबरोबर नृत्य नावाचा अश्लील प्रकार, अंगविक्षेप करणे यात तिला काहीच गैर, आक्षेपार्ह वाटत नसेल, तर ही मुलगी बायको म्हणून स्वीकाराल का? जगरहाटी आहे. पोरगी नुसती फिरवायची असेल तर एकदम मॉड, सिगारेट ओढणारी, आपल्याबरोबर डिं्रक्स घेणारी असेल तर फारच छान! पण लग्नाच्या वेळी डोक्यावरून किंवा दोन खांद्यावरून पदर घेणारी सालस पोरगीच हवी असते, बरोबर ना?
काही घरात आता बक्कळ पैसा आला आहे. नवरा-बायको दोघेही गलेलठ्ठ पगारांच्या नोकऱ्या करणारे. त्यातून विमेन्स लिब किंवा स्त्री मुक्तीचे फॅड, मुला-मुलींत फरक करायचा नाही, या चांगल्या विचारांचा विचका या लोकांनी केला. मुलांप्रमाणे पॅंट घालायची, केस कापायचे आणि वाट्टेल तसे बेफाम वागण्यासाठी भरपूर पॉकेटमनी द्यायचा. तरुण मुलगी रात्री 1-2 वाजता घरी आली तरी "इतका वेळ कोठे होतीस, काय करत होतीस?' असा जाब तिला घरच्यांनी विचारायचा नाही, याला स्त्रीमुक्ती म्हणतात का? मुलीला असा जाब विचारणे, कपडे नीट परिधान करायला लावणे, यात कसला स्वातंत्र्याचा संकोच?
तरुण मुलींच्या बापांनो, मुळात मुलींना भलते सलते स्वातंत्र्य देऊ नका, दिलेल्या स्वातंत्र्याचा ती दुरुपयोग करते असे दिसले तर इंजिनीअरिंग किंवा मेडिकलला असली तरी तात्काळ शिक्षण बंद करून घरी बसवा. याबाबतीत त्यावेळी हलगर्जीपणा करून आता ढसढसा रडणारे बाप माझ्या पाहण्यात आहेत म्हणून मी सांगतो. त्याहूनही वाईट अवस्था म्हणजे आईबापांची कदर न करता मुलगी परधर्मीयांशी लग्न करते. 5-6 महिन्यांत भ्रमनिरास होऊन माघारी येते. या मुलीला परत घरात घ्यायचे की नाही, अशा पेचात अडकलेल्या बापांची करुण अवस्था मी पाहिली आहे. स्त्री-स्वातंत्र्याच्या नावाखाली उल्लूपणाला बहर आला आहे!
पुण्यात झालेल्या ब्राह्मण अधिवेशनातील एक किस्सा सांगतो. महिला विषयावरील परिसंवादात अश्विनी धोंगडे नावाच्या एक विदुषी बोलल्या. त्या माजी प्राचार्या आहेत. नको तेच बोलल्या. मुलींनी पॅंट घातली तर बिघडले कोठे? येथपासून आता जानवे घालायची काय गरज? वगैरे. प्रथम शेम शेमच्या घोषणा झाल्या. नंतर श्रोत्यांनी भाषण बंद पाडून अश्विनीबाईस माफी मागायला लावली. अधिवेशनाचे अध्यक्ष घैसास गुरुजी यांनी व्यासपीठावर येऊन या वक्तव्याबद्दल माफी मागितली. जे विचार आक्षेपार्ह आहेत ते एवढ्या खुलेपणाने मांडण्याचा निर्लज्जपणा अंगी आला. कशाने? तर जादा शिक्षण आणि रग्गड पैसा. त्यामुळे या मध्यमवर्गीयांची संस्कृतीशी नाळ एकदम तुटली आहे. या अश्विनीबाईंनी मुलींच्या बेताल वागण्याचे समर्थन करताना तरुणांनीच ते भाषण बंद पाडावे, हे विशेष! यानंतर पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकाने लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने शंख केला. पुणे पूर्वी विद्येचे माहेर होते. आता विद्या सासरी गेली आणि सून म्हणून लक्ष्मी पुण्यात ठाण मांडून आहे. लग्न म्हणजे 2-3 वर्षांचा शरीरसंबंध, लग्नाशिवाय आवडेल तितके दिवस एकत्र राहणे, पटले नाही, कंटाळा आला की दुसरा पार्टनर! अशी जीवनपद्धती पुण्यात वाढत आहे. पुण्यातील "ते' दैनिक आणि अश्विनी धोंडगे यांच्यासारखी उच्च विद्याभूषित बाई या पद्धतीचे समर्थन करीत आहेत.
अभद्र लिहिण्याची इच्छा होत नाही, पण स्त्रीशक्ती आणि स्त्रीमुक्ती यातील फरक न कळणाऱ्या या पामरांच्या तरुण मुली पॅंट, आखूड स्कर्टच काय, काहीही न घालता फिरल्या तरी वाद घालायचा नाही. पोलीस पाहून घेतील, पण यांच्या या उद्दीपित करणाऱ्या कपड्यांनी आणि वागण्याने बलात्काराचे कितीतरी प्रकार घडतात. गोव्यातील एक प्रकरण गाजते आहे. दिल्लीत इंडिया गेटजवळ अशीच झिंगलेली तरुण मुलगी मध्यरात्री एका पोलिसाला दिसली. फसला बिचारा. रानात जळणासाठी लाकूडफाटा आणायला गेलेली एकटी दुकटी कष्टकरी महिला आणि मध्यरात्री दारू पिऊन वर्दळ नसलेल्या भागात फिरणारी टंच कपड्यातील तरुणी यात निश्चितच फरक आहे. इंडिया गेटजवळचा पोलीस आणि गोव्यातील मंत्री बाबू मोन्सेरात यांचा मुलगा हे दोषी आहेत, पण त्यांना हे पाप करायला लावणारे जबाबदार कोण?
अश्विनीबाई असे बोलल्या आणि दुसऱ्याच दिवशी कर्नाटकात मंगलोर शहरात एक प्रकार झाला. अश्विनीबाई ज्या जीवनपद्धतीचे समर्थन करीत होत्या, ती जीवनपद्धती अंगिकारलेल्या चांगल्या घरातील काही तरुणी एका पबमध्ये गेल्या. तेथे त्यांनी दारू ढोसली. ती चढल्यावर तेथील संगीताच्या तालावर त्यांचा नाच सुरू झाला. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना हे कळताच सुमारे 50 तरुण पबवर चाल करून गेले. या झिंगलेल्या पोरींना पबच्या बाहेर काढले. या पोरींना स्वत:चा तोलही सांभाळता येत नव्हता. बाहेर येण्यास नकार देणाऱ्या मुलींना थोबाडीत मारण्यासही या तरुणांनी कमी केले नाही. नंतर या मुलींना त्यांच्या घरी सुखरूप पोचवण्यात आले.
श्रीराम सेनेच्या तरुणांच्या या कृत्याचे मी पूर्णपणे समर्थन करतो। त्या तरुणांना शाबासकी देतो. मात्र टाईम्स नाऊ या इंग्रजी वाहिनीला या प्रकाराने इंगळ्या डसल्या. तिकडे दिल्लीत रेणुका चौधरी या मंत्रीण बाईने थयथयाट सुरू केला आहे. या तरुणींचे कृत्य गैर असेल तर या मुलींच्या आईबापांनी तशी तक्रार करायला हवी. प्रत्यक्षात एकाही पालकाने तक्रार केली नाही. मला खात्री आहे, आपल्या पोरींची ही झेप पाहून आईबापांना चक्कर आली असेल. या प्रकाराचा होणारा गाजावाजा त्यांनाही नको असेल. बभ्रा झाला तर या मुलींची पुढे लग्ने कशी होणार? अशी या पालकांना चिंता असेल. त्या रेणुका चौधरीचे काय जाते? या मुलांवर खटला भरलाच तर या मुली कोर्टात येऊन काय सांगणार, पबमधून झिंगलेल्या अवस्थेत बाहेर काढले म्हणून? ना बलात्कार, ना विनयभंग. दंगलीच्या कलमाखाली या तरुणांना शिक्षा झाली तरी या मुलींच्या वर्तनाचे एकतरी सभ्य माणूस समर्थन करेल का? हा प्रश्न कॉंग्रेसच्या मंत्रीणबाईने भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना कात्रीत पकडण्याचा असा क्षुद्र प्रकार राजकीय नाही, टाईम्स नाऊ या चॅनलचा टीआरपी वाढवायचा त्यासाठीचा हा विषय नाही. हा उद्‌ध्वस्त होणाऱ्या घरांचा विषय आहे. एका हातात कंडोम आाणि दुसऱ्या हातात रमची बाटली असलेली आजची तरुणी ही उद्याची आई आहे. ती आपल्या मुलांवर काय संस्कार करणार? यापूर्वीच्या पिढ्यांपुढे हा प्रश्न आला नाही. अध:पतनाला आता सुरुवात झाली आहे. शिक्षण आहे, पण अक्कल नाही! असे समर्थक त्याला लाभत आहेत. हे अध:पतन रोखण्याचे काम कर्नाटकातील श्रीराम सेनेने केले आहे. या सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचे त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा ! सोलापूर शहरातील स्थिती इतक्या उघडपणे नसली तरी बिघडलेलीच आहे. कोण काय म्हणते, याकडे साफ दुर्लक्ष करून तरुणांनी संस्कृती रक्षणाचा वसा उचलावा.